यूपीत ‘लुटेरी दुल्हन’ गँगची धरपकड; लग्नाच्या सातव्या दिवशी वधू दागिने घेऊन व्हायची पसार!
उत्तर प्रदेशमध्ये 'लुटेरी दुल्हन' नावाच्या गँगने विवाहासाठी आतुरतेने मुलगी शोधणाऱ्या पुरुषांना फसवून पोबारा केल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. गरीब महिलांना लग्नाचे आमिष दाखवून, विवाहोत्सुक तरुणांना फसवून, लग्नानंतर नवरी माहेरी पाठवून, दागिने घेऊन पळून जाण्याची पद्धत या गँगची होती. पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, या गँगने किती जणांना फसवले याची आकडेवारी नाही.