सकाळी लव्ह अन् सायंकाळी अरेंजमॅरेज; ‘या’ पठ्ठ्याने एकाच दिवसांत केले दोन महिलांशी लग्न
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एका व्यक्तीने एकाच दिवशी दोन लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. चार वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर कुटुंबाच्या विरोधामुळे त्याने सकाळी प्रेयसीशी कोर्ट मॅरेज केले आणि संध्याकाळी कुटुंबाने ठरवलेल्या मुलीशी पारंपरिक विधीने लग्न केले. प्रेयसीने अपमानाचा दावा करत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.