महाकुंभमेळ्यासाठी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा; योगी आदित्यनाथ सरकारचा मोठा निर्णय!
उत्तर प्रदेशमध्ये बारा वर्षांतून एकदा होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. प्रयागराजमध्ये होणाऱ्या या मेळ्यासाठी योगी सरकारने स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा केली आहे, ज्याचे नाव 'महा कुंभ मेळा' असेल. या जिल्ह्याचे व्यवस्थापन पूर्णपणे स्वतंत्र असेल. १३ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होणाऱ्या या मेळ्याच्या व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत.