महाकुंभ परिसरात वाहनांवर बंदी; चेंगराचेंगरीनंतर सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे!
महाकुंभ मेळ्यात ३० भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने २०२५ साठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये वाहनांवर बंदी, व्हीव्हीआयपी पास रद्द, आणि गर्दीचे व्यवस्थापन यांचा समावेश आहे. प्रयागराज परिसरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस गस्त वाढवली जाईल. भाविकांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था केली जाईल. योगी आदित्यनाथ यांनी या उपाययोजनांची घोषणा केली.