बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद शिरसाट यांच्या पत्नी विमानातच होत्या, पण…
२०१४ साली मलेशियन एअरलाईन्सचं MH370 विमान बेपत्ता झालं, ज्यात पाच भारतीय नागरिक होते. पुण्यातील प्रल्हाद शिरसाट यांच्या पत्नी क्रांती शिरसाटही यात होत्या. विमानाचा शोध लागला नाही, आणि २०१७ मध्ये शोधमोहीम थांबवली. डिसेंबर २०२४ मध्ये मलेशिया सरकारने पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यास मान्यता दिली. प्रल्हाद शिरसाट यांनी आशा सोडली असून, मलेशियन सरकारवर विश्वास नसल्याचं सांगितलं.