दीड लाखांचा iPhone ऑनलाईन मागवला, डिलिव्हरी मॅन येताच पैसे देण्याऐवजी त्याचाच जीव घेतला
लखनऊमध्ये ३० वर्षीय डिलिव्हरी बॉय भरत साहूची हत्या करण्यात आली आहे. गजानन नावाच्या व्यक्तीने फ्लिपकार्टवरून आयफोन ऑर्डर केला होता आणि कॅश ऑन डिलिव्हरी मोडवरून आयफोन घेतला. पैसे देण्याऐवजी गजाननने भरतचा गळा घोटून त्याचा मृतदेह इंदिरा कालव्यात फेकला. पोलिसांनी तपास करून गजाननचा मित्र आकाशकडून माहिती मिळवली. अद्याप मृतदेह सापडलेला नाही, एसडीआरएफकडून शोध सुरू आहे.