मेरठ हत्या प्रकरणातील आरोपींना ड्रग्सचं व्यसन, तुरुगांतही केली मॉर्फिन इंजेक्शनची मागणी
मेरठ येथील मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना अटक करण्यात आली आहे. दोघेही गंभीर अंमली पदार्थांच्या व्यसनात असून तुरुंगातही ड्रग्सची मागणी करत आहेत. मुस्कानने साहिलसोबत मिळून सौरभची हत्या केली आणि त्याचे शरीर तुकडे करून ड्रममध्ये लपवले. अटकेनंतर, दोघांना तुरुंगात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर व्यसनमुक्ती उपचार सुरू आहेत.