पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला कॅन्सर झाल्याची शक्यता, वकिलाने दिली माहिती
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला कर्करोग झाल्याची शक्यता आहे, अशी माहिती त्याच्या वकिलांनी मुंबईतील विशेष न्यायालयात दिली. चोक्सीवर उपचार सुरू असून काही चाचण्या करण्यात येत आहेत. तपास यंत्रणांनी चोक्सी आणि नीरव मोदी यांच्या मालमत्तांवर कारवाई सुरू केली आहे. चोक्सीने प्रकृती अस्वस्थतेचे कारण देत कोर्टात हजर राहण्यासाठी वेळ मागितली आहे. त्याचा पासपोर्टही रद्द करण्यात आला आहे.