Video: अयोध्येच्या रामलीलेमध्ये मिस युनिव्हर्स इंडिया! रिया सिंघानं स्वत: दिली माहिती!
नवरात्री आणि दसऱ्याच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, ज्यात गरभा-दांडिया आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो. उत्तर भारतात 'रामलीला' विशेष लोकप्रिय आहे. यंदा मिस युनिव्हर्स इंडिया २०२४ रिया सिंघा रामलीलेमध्ये सीतेची भूमिका साकारणार आहे. मनोज तिवारी रामाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रिया सिंघा १८ वर्षांची असून, ती अहमदाबादची फॅशन डिझायनर आहे.