Sunita Williams Public Reaction
1 / 30

“मुस्कुराने की वजह तुम हो!” सुनीता विल्यम्सच्या ‘घर’वापसीवर सोशल मीडियावर कौतुक सोहळा

NASA Space X Crew-9 Return Updates: २८६ दिवस अवकाशात राहून, ४५७७ वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा घालून आणि १९५.२ दशलक्ष किलोमीटर अंतर कापून, नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स सुरक्षितपणे पृथ्वीवर परतल्या आहेत. तांत्रिक बिघाडामुळे परतीचा प्रवास लांबला होता. फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ उतरल्यानंतर जगभर जल्लोष झाला. भारतीय वडिलांमुळे भारतीयांनीही आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या.

Swipe up for next shorts
ankita walawalkar satya manjrekar birthday suka sukhi
2 / 30

अंकिता वालावलकरने पतीसह महेश मांजरेकरांच्या हॉटेलला दिली भेट, सेलिब्रेशनचा व्हिडीओ चर्चेत

प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकर याने दोन वर्षांपूर्वी गोरेगाव, मुंबईत 'सुका सुखी' हॉटेल सुरू केले. या हॉटेलमध्ये अनेक सेलिब्रिटी जेवणाचा आस्वाद घेतात. बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकरने सत्याच्या वाढदिवसाचा व्हिडीओ शेअर केला, ज्यात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, सई मांजरेकर आणि इतर काही जण दिसतात. सत्याने हॉटेलच्या कल्पनेबद्दल सांगितले की, हे त्याच्या वडिलांचे स्वप्न होते.

Swipe up for next shorts
Jaswand home made khat zero rupees jugaad for Hibiscus fertilizer see video
3 / 30

शून्य रुपयात जास्वंदाला द्या असं खत की फुलांनी रोप भरून जाईल; कॉफीमध्ये मिसळा ही गोष्ट

जास्वंदाचं रोप घरी असावं असं सगळ्यांनाच वाटतं. श्रीगणेशाचं आवडतं फूल म्हणजे जास्वंद. घरी बाप्पाची पूजा करताना आपल्या बागेत फुललेलं एखादं तरी फूल चरणावर वाहावं अशी अनेकांची इच्छा असते. याच इच्छेपोटी आपण बाजारातून जास्वंदाच्या फुलांची रोपं आणतो, त्याला वेळोवेळी सूर्यप्रकाश व पाणी देऊन त्याची निगासुद्धा राखतो, रोप तुम्ही लावलेल्या लहानश्या कुंडीत बहरत जातं, त्याला अगदी टवटवीत पाने येतात, पण कळ्या? कळ्या मात्र काही केल्या येतच नाहीत.  अशावेळी काय करावं हे आज आपण पाहणार आहोत. 

Swipe up for next shorts
Meerut murder case muskan rastogi instagram
4 / 30

‘तिला फासावर लटकवा’, पतीची हत्या करणाऱ्या मुस्कानच्या आई-वडिलांनी व्यक्त केला संताप

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये सौरभ राजपूत नावाच्या मर्चंट नेव्ही कर्मचाऱ्याची त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली. सौरभ दोन वर्षांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त लंडनहून परतला होता. ४ मार्च रोजी पत्नी मुस्कान रस्तोगी आणि प्रियकर साहिल शुक्लाने त्याची हत्या करून शरीराचे १५ तुकडे केले. मुस्कानच्या पालकांनी तिला फासावर लटकवण्याची मागणी केली आहे.

honda lauches 2025 Honda Shine 100 with OBD2B Compliance know its price and features
5 / 30

बाकी कंपन्यांची धाकधूक वाढली! Honda Shine 100 झाली लाँच, किंमत फक्त…

ऑटो 16 hr ago

Honda Shine 100 with OBD2B launched in India: होंडा मोटरसायकल अँड स्‍कूटर इंडिया (HMSI)ने आज सुधारित स्‍टाइलिंगसह अपडेटेड OBD2B कंप्लायंट शाइन १०० लाँच केली. नवीन २०२५ होंडा शाइन १०० ची किंमत ६८,७६७ रुपये (एक्‍स-शोरूम, दिल्‍ली) आहे. ही मोटरसायकल आता भारतभरातील एचएमएसआय डिलरशिप्‍समध्‍ये उपलब्‍ध आहे.

devendra fadnavis in vidhan sabha
6 / 30

Video: “…त्यांना कबरीतूनही खोदून काढू, सोडणार नाही”, फडणवीसांनी विधानसभेत दिला इशारा!

सोमवारी नागपूरमध्ये झालेल्या दंगलीची राज्यभर चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत निवेदन दिलं. त्यांनी दंगलीत 'पूर्वनियोजित पॅटर्न' असल्याचं सांगितलं, तर नागपूरचे पोलीस आयुक्त वेगळी माहिती देत आहेत. फडणवीसांनी पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. नागपूर शांत आहे आणि दोषींना शोधण्याचं काम सुरू आहे.

MPSC recruitment
7 / 30

‘MPSC द्वारे मोठी भरती होणार’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी UPSCच्या धर्तीवर MPSCचे कॅलेंडर तयार करण्याचे आश्वासन दिले. २०२५ पासून वर्णनात्मक परीक्षा पद्धत लागू होईल. MPSCच्या परीक्षा खासगी संस्थांकडून न घेता आयोगाकडूनच घेण्यात येतील. आगामी काळात मोठ्या प्रमाणात भरती राबवली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहिर केले.

Chutiyaram Trademark Controversy Latest Updates
8 / 30

हे ब्रँडचं नाव आहे की शिवी? ट्रेडमार्क ऑफिसनं आधी दिली मंजुरी, मग बदलला निर्णय!

गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर दिल्लीतील ट्रेडमार्क ऑफिसने मंजूर केलेल्या एका वादग्रस्त नावाची चर्चा सुरू आहे. फायनान्शियल एक्स्प्रेसनुसार, बिस्किट व स्नॅक्स उत्पादनांसाठी अर्जदाराने CHUTIYARAM नावाची निवड केली होती. मात्र, हे नाव अश्लील असल्याने मंजुरी रद्द करण्यात आली. ट्रेडमार्क कायद्याच्या कलम ९/११ अंतर्गत अशा नावांना मान्यता दिली जाऊ शकत नाही. अर्जदार यापूर्वीही अशाच नावांसाठी आग्रही होते.

Pune Viral Video
9 / 30

Video :पुण्यात पोलीस भरतीदरम्यान महिला उमेदवारांची तोबा गर्दी, गेट तुटला अन् …

पुण्यातील पोलीस भरतीदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. १९ मार्च रोजी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात ५३१ महिला पोलीस जागांसाठी भरती सुरू होती. तीन हजारांहून अधिक महिला उमेदवार आल्या होत्या, ज्यामुळे गेट तुटून पडला आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली. काही महिला जखमी झाल्याचं म्हटलं जातंय. पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी चेंगराचेंगरी झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे.

Celebrity Masterchef Tejasswi Prakash and Karan Kundrra are finally set to tie the knot in 2025
10 / 30

तेजस्वी प्रकाश ९ वर्ष मोठ्या करण कुंद्राशी यंदा करणार लग्न! अभिनेत्रीच्या आईने केला खुलासा

Tejasswi Prakash And Karan Kundra Wedding : हिंदी टेलिव्हिजनविश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे तेजस्वी प्रकाश व करण कुंद्रा. ‘बिग बॉस’च्या १५व्या पर्वात ही जोडी जमली. ‘बिग बॉस’मध्येच करणने तेजस्वीला प्रपोज केलं. या जोडीचा आता मोठा चाहता वर्ग आहे. तेजस्वी-करणचे व्हिडीओ, फोटो नेहमी व्हायरल होतं असतात. यंदा ही लोकप्रिय जोडी लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. याच कारण आहे तेजस्वी प्रकाशची आई.

pune bus fire today news marathi
11 / 30

पुण्यात आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर? मिनी बस अपघातात चौघांचा बळी!

पुणे 14 hr ago

पुणे शहरातील हिंजेवाडी भागात आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना नेणाऱ्या मिनी बसला आग लागून चार जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना सकाळी ७.३० वाजता घडली. बसमधील १४ प्रवाशांपैकी १० जणांनी उडी मारून जीव वाचवला, तर चार जण होरपळून मृत्युमुखी पडले. जखमींवर रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आयटी कर्मचारी संघटनांनी वाहनांच्या सेफटी ऑडिटची मागणी केली आहे.

salman Khan starrer Sikandar is all set to release on 30 March 2025
12 / 30

मुहूर्त ठरला! सलमान खानचा बहुचर्चित ‘सिकंदर’ चित्रपट ‘या’ प्रदर्शित होणार

 ए.आर.मुरुगदॉस दिग्दर्शित ‘सिकंदर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. १८ मार्चला ‘सिकंदर’ चित्रपटाचं नवं गाणं प्रदर्शित झालं. या चित्रपटातील नव्या गाण्याचं नाव ‘सिकंदर नाचे’ असं असून यामध्ये ५९ वर्षीय सलमान खानने जबरदस्त डान्स केला आहे. तसंच यामध्ये भाईजान व रश्मिका मंदानाची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. ‘सिकंदर नाचे’ या गाण्यामुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता ‘सिकंदर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

If you use expired soaps what will happen to the body allergies expert advice
13 / 30

साबण वापरायच्या आधी एक्स्पायरी डेट चेक करता का? एक्सपायर साबण वापरल्याने काय होतो परिणाम?

Expired soaps side effects: लेबल्स वाचणे हे केवळ खाण्यायोग्य प्रोडक्ट्ससाठी नाही तर तुम्ही सामान्यतः तुमच्या शरीरावर वापरत असलेल्या प्रोडक्ट्ससाठीदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. एक्स्पायरी आणि शेल्फ लाइफमधील फरक तुम्हाला आधीच माहीत असल्याने, तुम्ही तुमच्या शरीरावर एक्स्पायरी साबण वापरता तेव्हा काय होते, याबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

Shiv Thakare replace to dipika kakar in celebrity masterchef
14 / 30

‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये दीपिका कक्करची जागा घेणार लोकप्रिय मराठी अभिनेता?

Celebrity MasterChef : ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रम सध्या खूप चर्चेत असतो. या कार्यक्रमाला हवा तसा टीआरपी मिळत नसला तरी सोशल मीडियावर याची कायम चर्चा रंगलेली असते. या कार्यक्रमातील व्हिडीओ खूप व्हायरल होतं असतात. नुकतंच ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ला दीपिका कक्करने रामराम केला. त्यामुळे आता तिच्या जागी कोण दिसणार? असा प्रश्न उपस्थित होतं आहे. लोकप्रिय मराठी अभिनेत्याला दीपिकाच्या जागी विचारणा झाल्याचं समोर आलं आहे.

dipika kakar emotion on exit from celebrity masterchef
15 / 30

‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ सोडताना दीपिका कक्कर झाली भावुक, म्हणाली…

Celebrity MasterChef : ‘सोनी टीव्ही’ वाहिनीवरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रम प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. या कार्यक्रमातील नवनवीन हटके टास्क प्रेक्षकांना खूप आवडत आहे. त्यामुळे कार्यक्रमाची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. पण, आता ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ला दीपिका कक्करने ( Dipika Kakkar ) रामराम केला आहे. तिच्या एक्झिटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

sunita williams butch willmore return marathi news (2)
16 / 30

सुनीता विल्यम्स यांच्या भारतातील गावी जल्लोष; त्यांच्या सुरक्षित परतीसाठी केला होता यज्ञ!

नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर २८६ दिवसांनंतर पृथ्वीवर परतले. तांत्रिक अडचणींमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहावे लागले. बुधवारी पहाटे SpaceX Crew Dragon Capsule अमेरिकन सागरात उतरली. सुनीता विल्यम्स यांच्या गुजरातच्या झुलासन गावात जल्लोष करण्यात आला. त्यांच्या सुरक्षित परतीसाठी गावकऱ्यांनी प्रार्थना केली होती. परतल्यानंतर त्यांना ४५ दिवसांच्या रिहॅबिलिटेशनमध्ये राहावे लागणार आहे.

Sunita Williams Space Health Impact after Mission
17 / 30

सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या, पण शारिरीक नुकसानाचं काय? ४५ दिवस रिहॅबिलिटेशनमध्ये…

नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर हे ८ दिवसांच्या अंतराळ मोहिमेनंतर तांत्रिक अडचणींमुळे २८६ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकले होते. अखेर ते पृथ्वीवर परतले आहेत. परंतु, त्यांच्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी त्यांना ४५ दिवसांच्या 'अॅक्लमेटायझेशन प्रोग्राम'मध्ये राहावे लागणार आहे. या काळात त्यांना पृथ्वीच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार केले जातील.

Jau Bai Gavat winner Ramsha Farooqui appeared in CID serial
18 / 30

‘जाऊ बाई गावात’ची विजेती रमशा फारुकी झळकली CID मालिकेत, दयाबरोबर फोटो शेअर करत म्हणाली…

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘जाऊ बाई गावात’ हा रिअ‍ॅलिटी शो चांगलाच गाजला होता. या अफलातून संकल्पना असलेल्या रिअ‍ॅलिटी शोचं सूत्रसंचालन हार्दिक जोशीने केलं होतं. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘जाऊ बाई गावात’च्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. तीन महिन्यांच्या रोलरकोस्टर राईडनंतर रमशा फारुकीने बाजी मारून ‘जाऊ बाई गावात’ ट्रॉफीवर नाव कोरलं. रमशाला २० लाखांचा धनादेश आणि ट्रॉफी देण्यात आली होती. हीच रमशा नुकतीच सीआयडी (CID) मालिकेत झळकली.

Amitabh Bachchan becomes one of India highest taxpayers
19 / 30

वर्षभराची कमाई ३५० कोटी अन् कर…; अमिताभ बच्चन ठरले यंदाचे सर्वाधिक कर भरणारे सेलिब्रिटी

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे ८२ वर्षांच्या असूनही चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारत आहेत. त्यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षात १२० कोटी रुपये कर भरला आहे, ज्यामुळे ते भारतातील सर्वाधिक कर भरणारे सेलिब्रिटी ठरले आहेत. त्यांनी चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट्स आणि 'कौन बनेगा करोडपती' होस्ट करून ३५० कोटी रुपये कमावले आहेत. अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती'च्या आगामी पर्वात होस्ट म्हणून परतण्याचं आश्वासन दिलं आहे.

salman khan rashmika mandanna starrer sikandar movie new song Sikandar naache released
20 / 30

‘सिकंदर’ चित्रपटातील नवीन गाणं प्रदर्शित, ५९ वर्षीय भाईजानने केला जबरदस्त डान्स

सलमान खानच्या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘सिकंदर’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या वर्षी ‘सिकंदर’ चित्रपटाची घोषणा झाली. तेव्हापासून सलमान खानच्या या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे दोन टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सध्या ‘सिकंदर’मधील गाण्यांचा धुमाकूळ सुरू आहे. नुकतंच या चित्रपटातील नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात पुन्हा एकदा सलमान खान व रश्मिका मंदानाची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. एवढंच नाहीतर ५९ वर्षीय सलमानने जबरदस्त डान्स केला आहे.

russia ukrain nuclear war
21 / 30

“पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना युक्रेनविरोधात अण्वस्त्र वापरण्यापासून रोखलं”!

रशिया-युक्रेन युद्धात अण्वस्त्र वापर होणार होता, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना अण्वस्त्र न वापरण्यास प्रवृत्त केल्याचा दावा पोलंडचे उपमंत्री व्लॅदीस्लॉ तिओफिल बार्टोसझेवस्की यांनी केला आहे. मोदींनी पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले. मोदींच्या मते, युक्रेन-रशिया चर्चेतूनच शांती प्रस्थापित होऊ शकते.

After 500 years Laxmi Narayan Shukraditya Malvya triple rajyog
22 / 30

५०० वर्षांनंतर ‘शुक्रादित्य, बुद्धादित्य’सह ३ राजयोग निर्माण होणार, या राशीना होईल फायदा

March 2025 Triple Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करतात आणि शुभ योग आणि राजयोग निर्माण करतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. मार्च महिन्यात 'शुक्रादित्य राजयोग', 'बुद्धादित्य राजयोग' आणि 'लक्ष्मी नारायण राजयोग' हे ३ राजयोग निर्माण होत आहे जे जवळजवळ ५०० वर्षांनंतर तयार होत आहेत.

who is shikhar pahariya janhvi kapoor boyfriend
23 / 30

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू आहे शिखर पहारिया, काय करतो जान्हवीचा बॉयफ्रेंड?

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहारिया सध्या चर्चेत आहे. शिखरने जातीवरून कमेंट करणाऱ्या तरुणीला सुनावलं आहे. शिखर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. तो प्रोफेशनल पोलो खेळाडू असून, व्यवसायिक आहे. जान्हवी व शिखरचे नाते चर्चेत आहे. शिखरची संपत्ती ८४ कोटी रुपये असून, त्याच्याकडे लक्झरी कार आहेत.

niketan kadam DCP
24 / 30

“शेकडोंच्या जमावातील एकाने कुऱ्हाडीने…”, उपायुक्तांनी सांगितला ‘तो’ थरारक घटनाक्रम

नागपूरमध्ये झालेल्या भीषण दंगलीत अनेक पोलीस आणि नागरीक गंभीर जखमी झाले आहेत. नागपूर झोन ५ चे उपायुक्त निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले, ज्यामुळे त्यांना खोलवर जखम झाली आहे. त्यांनी सांगितले की, नागपूरचे सीपी सर आणि एसआरपीएफ जवानांच्या मदतीने परिस्थिती हाताळली गेली. दंगलीच्या वेळी अरुंद गल्ल्यांमध्ये दगडफेक आणि शस्त्रांचा वापर होत होता.

Vallari viraj share special post of Navri Mile Hitlerla serial completed one year
25 / 30

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेला एक वर्ष झालं पूर्ण! वल्लरी विराज खास क्षण शेअर करत म्हणाली…

गेल्यावर्षी १८ मार्चपासून ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका सुरू झाली. बऱ्याच वर्षांनी या मालिकेच्या माध्यमातून राकेश बापटने मराठी मालिकाविश्वात पदार्पण केलं. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना खूप चांगलं खिळवून ठेवलं आहे. त्यामुळेच दिवसेंदिवस या मालिकेचा प्रेक्षक वर्ग वाढताना दिसत आहे. आज ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेला वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्ताने लीला म्हणजेच वल्लरी विराजने खास पोस्ट लिहिली आहे.

bjp mp pradeep purohit narendra modi shivaji maharaj statement
26 / 30

Video: “नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म”, लोकसभेत भाजपा खासदाराचा दावा!

लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला जन्म देवाने पाठवला असल्याचे विधान केले होते, ज्यावर विरोधकांनी टीका केली होती. आता भाजपा खासदार प्रदीप पुरोहित यांनी लोकसभेत मोदींचा पूर्वजन्म छत्रपती शिवाजी महाराजांचा असल्याचे विधान केले आहे. यावर विरोधक आणि नेटिझन्सनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनीही भाजपवर शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.

troller calls Janhvi Kapoor boyfriend Shikhar Pahariya dalit
27 / 30

“तू दलित आहेस” म्हणणाऱ्या ट्रोलरवर भडकला जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड; म्हणाला, “अस्पृश्य…”

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर शिखर पहारियाबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. शिखरने दिवाळीनिमित्त पोस्ट केलेल्या फोटोंवर जातीयवादी कमेंट आल्यावर त्याने तीव्र प्रतिक्रिया दिली. शिखरने अशा विचारसरणीला खेदजनक म्हटले आणि भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे महत्त्व सांगितले. शिखर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. त्याने महिला दिनानिमित्त आई, आजी आणि जान्हवीसाठी खास पोस्ट केल्या होत्या.

bangalore metro ad
28 / 30

कन्नड भाषा अनिवार्य न केल्यामुळं नोकर भरतीची जाहिरात कर्नाटक सरकारने मागे घेतली

बंगळुरू मेट्रो रेल महामंडळाने ५० लोको ऑपरेटरच्या भरतीसाठी कन्नड भाषेचे ज्ञान आवश्यक नसल्याची जाहिरात दिली होती. कन्नड संघटनांनी यावर आक्षेप घेतल्याने ही भरती रद्द करण्यात आली. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी बीएमआरसीएलला जाहिरात मागे घेण्याचे आदेश दिले. राज्य सरकारच्या नियमावलीचे पालन करत स्थानिक उमेदवारांना न्याय देणारी नवी जाहिरात काढण्याचे बीएमआरसीएलने जाहीर केले आहे.

New India Cooperative Bank fraud
29 / 30

न्यू इंडिया बँकेतील १२२ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी भाजपा नेत्याच्या भावाला अटक

मुंबई March 18, 2025

न्यू इंडिया सहकारी बँकेत १२२ कोटींच्या अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. भाजपाचे माजी प्रदेश सचिव हैदर आझम यांचे बंधू जावेद आझम यांना अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक झाली असून पुढील तपास सुरू आहे. न्यू इंडिया बँकेचे १.३ लाख खातेदार असून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये २८ शाखा आहेत.

devendra fadnavis on chhava marathi
30 / 30

“‘छावा’मुळे औरंगजेबाबद्दलचा राग बाहेर येतोय, पण…”, फडणवीसांनी केला विधानसभेत उल्लेख!

नागपूरमधील दंगलीच्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. सोमवारी झालेल्या दंगलीत ३३ पोलीस जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली. त्यांनी 'छावा' चित्रपटाचा उल्लेख करत औरंगजेबाबद्दलचा संताप व्यक्त केला. फडणवीसांनी कायदा-सुव्यवस्था राखण्याचं महत्त्व सांगितलं आणि दंगा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला.