“महाकुंभमेळा चेंगराचेंगरीत मी आई गमावली, तिच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी…”, मुलाची खंत
महाकुंभ 2025 मध्ये मौनी अमावस्येच्या दिवशी चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला. बिहारच्या धनंजय कुमार गोंड यांच्या आईचा यात समावेश आहे. धनंजय यांना आईच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी प्रशासन, पोलीस आणि इतर कार्यालयांमध्ये वणवण करावी लागत आहे. प्रमाणपत्र कोण देईल याबाबत स्पष्टता नाही.