सुनीता विल्यम्स यांना मिळाला फक्त ४३० रुपयांचा भत्ता, डोनाल्ड ट्रम्प अवाक; म्हणाले…
नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे तांत्रिक अडचणींमुळे २७८ दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अडकले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्रकार परिषदेत त्यांच्या भत्त्याबाबत विचारले असता, त्यांनी मजेशीर उत्तर दिले. नासाच्या धोरणानुसार, अंतराळवीरांना अतिरिक्त वेळेसाठी फक्त ५ डॉलर्स दैनंदिन भत्ता मिळतो.