मोठी बातमी! नॅशनल हेराल्डप्रकरणी आरोपपत्रात सोनिया आणि राहुल गांधींचं नाव
नॅशनल हेराल्ड प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी ९ एप्रिल रोजी दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली असून पुढील सुनावणी २५ एप्रिल रोजी होणार आहे. या प्रकरणात काँग्रेस नेते सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांचाही समावेश आहे.