नवी मुंबईतील ‘या’ कंपनीसह चार भारतीय कंपन्यांवर ट्रम्प प्रशासनाकडून निर्बंध!
अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांच्या अंतर्गत इराणमधून तेल वाहतूक करणाऱ्या चार भारतीय कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. यात नवी मुंबईतील फ्लक्स मेरिटाईम एलएलपी, दिल्ली एनसीआरमधील बीएसएम मरीन एलएलपी, ऑस्टिनशिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि तंजावरमधील कॉसमॉस लाईन्स इंक यांचा समावेश आहे. या कंपन्यांवर इराणच्या तेलाची वाहतूक केल्याचा आरोप आहे. याआधीही भारतीय कंपन्यांवर अशा निर्बंध लादण्यात आले आहेत.