आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजपा एनडीए ३०० पार, ‘हा’ सर्व्हे नेमकं काय सांगतो?
मागील वर्षी लोकसभा निवडणुकीत भाजपाला २३९ जागा मिळाल्या होत्या. हरियाणा, महाराष्ट्र, आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने चांगली कामगिरी केली. इंडिया टुडे सी व्होटर्सच्या सर्व्हेनुसार आज निवडणुका झाल्यास एनडीएला ३०० हून अधिक जागा मिळतील. नरेंद्र मोदींना ५१% लोकांनी पंतप्रधान म्हणून पसंती दिली आहे. सर्व्हेनुसार, मोदींना ५०.७% लोकांनी उत्कृष्ट पंतप्रधान मानले आहे.