नीलम गोऱ्हेंचा आरोप, “उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं…”
दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा आरोप केला. यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नीलम गोऱ्हेंवर नमकहरामीचा आरोप केला. गोऱ्हे यांनी शिवसेनेतील नेत्यांच्या भेटींबाबतही नाराजी व्यक्त केली.