पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयएकडे, गृहमंत्रालयाचा महत्त्वाचा निर्णय
केंद्र सरकारने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवला आहे. गृह मंत्रालयाने याबाबत अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. एनआयएने हल्ल्याशी संबंधित प्राथमिक माहिती गोळा केली असून, स्थानिक पोलिसांकडून केस डायरी, एफआयआर आणि इतर कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. हल्ल्यात २६ पर्यटक मारले गेले असून, एनआयए लवकरच सखोल तपास करून अहवाल सादर करेल.