रात्री भटकंतीला गेलेल्या दोन जवानांवर जमावाचा हल्ला, मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार
मध्य प्रदेशमध्ये महू-मंडलेश्वर मार्गावर जाम गेट येथे बुधवारी रात्री भारतीय लष्कराच्या दोन प्रशिक्षणार्थी जवानांच्या मैत्रिणींवर सहा जणांच्या टोळक्याने सामूहिक बलात्कार केला. टोळक्याने जवानांना मारहाण केली आणि एका जवानाला पैसे आणण्यासाठी पाठवले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.