पहलगाम हल्ल्याचा नवा व्हिडीओ, झिपलाईनवरच्या पर्यटकाच्या मोबाइल कॅमेरात कैद झाला थरार
पहलगाम हल्ल्याचा थरार एका पर्यटकाच्या व्हिडीओत कैद झाला आहे. ऋषी भट्ट नावाच्या पर्यटकाने झिपलाईनवर असताना सहज व्हिडीओ घेतला, ज्यात दहशतवादी हल्ल्याचा प्रसंग कैद झाला. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. ऋषी भट्टने सांगितलं की, त्याच्या पत्नी आणि मुलाने त्याला व्हिडीओ थांबवायला सांगितलं. हल्ल्यानंतर त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहिल्याचंही सांगितलं.