पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी दीड वर्षापूर्वीच भारतात घुसले होते; अनेक हल्ल्यांमध्ये..
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्याने देशभर खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर भारत-पाकिस्तान संबंध ताणले गेले आहेत. संशयित दहशतवादी दीड वर्षांपूर्वी पाकिस्तानमधून भारतात घुसले होते. लष्कर, काश्मीर पोलीस, एनआयए यांची पथके अनंतनागमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांची रेखाटने जारी केली असून माहिती देणाऱ्यास २० लाखांचे इनाम जाहीर केले आहे.