बुलढाण्यातील पाच पर्यटक दहशतवादी हल्ल्यापासून थोडक्यात वाचले, हॉटेल मालकामुळे वाचला जीव
काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. बैसरन पर्वतावर फिरायला गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. हॉटेल मालकाच्या सावधगिरीमुळे बुलढाण्यातील पाच पर्यटकांचा जीव वाचला. हे जैन कुटुंब १८ एप्रिलला काश्मीरला गेले होते. गोळीबाराच्या वेळी ते हॉटेलमध्येच होते. सध्या हे कुटुंब सुरक्षित आहे आणि श्रीनगरला जाण्याची व्यवस्था करत आहे.