Video: “इथून चालते व्हा, नाहीतर…”, पहलगाम हल्ल्यानंतर काश्मिरी मुस्लिमांना धमक्या
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. भारताने पाकिस्तानला कडक शब्दांत सुनावले असून पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. उत्तराखंडमध्ये हिंदू रक्षा दलाच्या ललित शर्माने काश्मिरी मुस्लिमांना राज्य सोडण्याचे इशारे दिले आहेत. त्यामुळे काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आहे. पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांना सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे.