Video: “समस्या काश्मीरची नाही, सुरक्षा व्यवस्थेची आहे”, मृत पर्यटकाच्या पत्नीची आगपाखड!
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, ज्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. मृतांमध्ये सूरतचे शैलेश कलाथिया होते. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी पत्नी शीतल यांनी सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सरकारवर संताप व्यक्त करत व्हीआयपींना सुरक्षा मिळते, मग सामान्य करदात्यांच्या जीवाची किंमत नाही का, असा सवाल केला. शीतल यांनी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी न्यायाची मागणी केली.