पाकिस्तानचा स्वत:च्याच पायावर धोंडा, भारताशी सरसकट व्यापारबंदीमुळे ओढवलं मोठं संकट!
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अटारी सीमा बंद केल्याने भारत-पाकिस्तान व्यापार थांबला आहे. पाकिस्ताननेही व्यापार स्थगित केला असून, याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे. औषधांचा तुटवडा टाळण्यासाठी पाकिस्तानने आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या आहेत. भारतावर अवलंबून असलेल्या औषध उद्योगाला पर्यायी स्त्रोत शोधावे लागतील. व्यापार थांबवल्याने औषधांची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.