पाकिस्तानच्या संसदेत भारत-बांग्लादेश युद्धाचा उल्लेख, खासदारानं व्यक्त केली भीती!
१९७१ साली भारत-पाकिस्तान युद्धातून बांगलादेश स्वतंत्र झाला. आता पाकिस्तानमध्ये तशीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असे विधान पाकिस्तानच्या खासदार मौलाना फज्ल रेहमान यांनी संसदेत केले. बलुचिस्तान प्रांतातील काही जिल्हे स्वतंत्र होऊ शकतात आणि संयुक्त राष्ट्र त्यांना मान्यता देईल, असे त्यांनी म्हटले. बलुचिस्तानमध्ये वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हे विधान चर्चेत आले आहे.