“भारताला हरवलं नाही तर माझं नाव शाहबाज शरीफ नाही”, पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं अजब विधान!
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोमवारी पंजाब प्रांतातील एका कार्यक्रमात पाकिस्तान भारताला मागे टाकेल असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी जनतेला मेहनत करण्याचे आवाहन केले आणि पाकिस्तानला महान बनवण्याची शपथ घेतली. सोशल मीडियावर त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाकिस्तानमधील नेटिझन्स मात्र शरीफ यांच्यावर खोटी आश्वासनं देत असल्याची टीका करत आहेत.