“माझ्या दोन्ही मुलांना हृदयविकार, उपचाराकरता…”, पाकिस्तानी नागरिकाची भारताला विनंती!
पाकिस्तानी वडिलांनी आपल्या दोन मुलांच्या वैद्यकीय उपचारांसाठी भारतात अधिक वेळ राहण्याची परवानगी मागितली आहे. पहलगाम घटनेनंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना २९ एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. मुलांना जन्मजात हृदयरोग असून, दिल्लीतील प्रगत उपचारांसाठी ते आले आहेत. पुढील आठवड्यात शस्त्रक्रिया होणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांना पाकिस्तानी नागरिकांना शोधून मायदेशी पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.