“पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना युक्रेनविरोधात अण्वस्त्र वापरण्यापासून रोखलं”!
रशिया-युक्रेन युद्धात अण्वस्त्र वापर होणार होता, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना अण्वस्त्र न वापरण्यास प्रवृत्त केल्याचा दावा पोलंडचे उपमंत्री व्लॅदीस्लॉ तिओफिल बार्टोसझेवस्की यांनी केला आहे. मोदींनी पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले. मोदींच्या मते, युक्रेन-रशिया चर्चेतूनच शांती प्रस्थापित होऊ शकते.