पंतप्रधान मोदींच्या ‘Obesity Warriors’ यादीत मनू भाकेर, ओमर अब्दुल्लांसह १० जणांचा समावेश!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी देशातील लठ्ठपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी एक अनोखी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत मोदींनी राजकारण, क्रीडा, बिझनेस आणि मनोरंजन क्षेत्रातील १० मान्यवरांची नावं त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर जाहीर केली आहेत. 'मन की बात'मध्ये मोदींनी लठ्ठपणाच्या समस्येवर चिंता व्यक्त केली होती. ओमर अब्दुल्ला यांसारख्या मान्यवरांनी या मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.