जाहीर भाषणातून पंतप्रधान मोदींचा दहशतवाद्यांना थेट इशारा; म्हणाले, “मी…”
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीयांनी प्राण गमावले. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्याचा इशारा दिला आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय पंचायत राज दिवसाच्या निमित्ताने बोलताना मोदींनी दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन दिलं. त्यांनी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आणि दहशतवाद्यांना थेट इशारा दिला की भारत त्यांना ओळखून कठोर शिक्षा करेल.