PM Narendra Modi and Rahul Gandhi
1 / 30

नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना जोरदार उत्तर, “आम्ही संविधान जगणारे लोक, खिशात…”

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना उत्तर दिलं आहे. संविधानाचा उल्लेख करत मोदी म्हणाले, "जे लोक खिशात संविधान घेऊन फिरतात त्यांना हे कळणार नाही की मुस्लिम महिलांवर तुम्ही काय वेळ आणली होती. आम्ही ट्रिपल तलाकचा खात्मा केला आणि संविधानानुसार मुस्लिम मुलींना समानतेचा अधिकार दिला. आम्ही संविधानाचा सन्मान करणारे आणि संविधान जगणारे लोक आहोत."

Swipe up for next shorts
budh uday 2025 today horoscope
2 / 30

बुधाच्या उदयाने ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी; व्हाल कोट्याधीश

ग्रहांचा राजकुमार बुध हा नऊ ग्रहांमधील खूप खास ग्रह मानला जातो. बुध ग्रह बौद्धिक क्षमता, प्रगती, व्यवसाय, ज्ञान, शिक्षण, वादविवाद इत्यादींचा कारक मानला जातो; यामुळे बुध ग्रहाच्या राशी बदलाचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या होत असतो. बुध ग्रहाचा २१ जानेवारी रोजी अस्त झाला. आता २२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता बुधाचा कुंभ राशीत उदय होईल. कुंभ राशीत बुध राशीच्या उदयामुळे अनेक राशींना फायदा होईल, पण अशा तीन राशी आहेत, ज्यांना भरपूर फायदे मिळू शकतात.

Swipe up for next shorts
What happens to your body when you don't poop everyday
3 / 30

पोट रोज नीट साफ होत नसेल, तर त्याचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो? वाचा

Bowel movement problems : अनेकांचं रोज पोट नीट साफ होत नाही. अशानं कामात मन लागत नाही आणि मग विविध आजारांचा धोका वाढतो. पोट साफ न होण्याचं मुख्य कारण म्हणजे बद्धकोष्ठता. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हल्ली अनेकांना हा त्रास जाणवतोय. पण, पोट साफ न होण्यामागे आणखी काही वेगळी कारणं आहेत का? त्यामुळे आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो? याविषयी डॉक्टरांकडून जाणून घेऊ…

Swipe up for next shorts
Success story of kokila who started wooden toy business at the age of 42 know earning lakhs her husband died due to cancer
4 / 30

वयाच्या ४२व्या वर्षी महिलेने सुरू केला ‘हा’ व्यवसाय, आता महिन्याला करतात लाखोंची कमाई

Success story of Kokila: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अडचणींनी भरलेला काळ येतो, परंतु त्या काळातून कसे लढायचे आणि कसे बाहेर पडायचे हे त्या व्यक्तीला माहीत असले पाहिजे. आज आपण एका अशा महिलेची कहाणी जाणून घेणार आहोत, जिने तिच्या कठीण काळातही हार मानली नाही आणि वयाच्या ४२ व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. या महिलेचं नाव आहे कोकिला.

PM Narendra Modi Speech
5 / 30

नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशा एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, ते..”

आपल्या देशात एक पंतप्रधान होऊन गेले त्यांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं. त्यांनीच हे म्हटलं होतं की दिल्लीतून जेव्हा एक रुपया निघतो तेव्हा गावांमध्ये १५ पैसे पोहचतात. त्या कालावधीत तर पंचायत ते पार्लमेंट एकाच पक्षाचं राज्य होतं. त्यावेळी त्याच पंतप्रधानांनी हे वक्तव्य केलं होतं. अत्यंत खुबीने केलेली ती हातसफाई होती. असं म्हणत राजीव गांधींचं नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला टोला लगावला.

AnJali Damania on Dhananjay Munde
6 / 30

“दमानिया नव्हे बदनामिया”, धनंजय मुंडेंच्या टीकेवर अंजली दमानियांचं प्रत्युत्तर

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषी क्षेत्रातील कथित भ्रष्टाचार उघड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळले. मुंडे यांनी दमानिया यांच्यावर सनसनाटी निर्माण करण्याचा आरोप केला. प्रत्युत्तरादाखल दमानिया यांनी पुरावे सादर केले आणि मुंडे यांच्यावर टीका केली. त्यांनी कृषी क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करत मुंडे यांचा राजीनामा मागितला.

World Cancer Day Lung Cancer Cases In Never-Smokers On The Rise Lancet Study
7 / 30

कधीही सिगारेट न ओढणाऱ्यांमध्ये वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण; संशोधनाचा निष्कर्ष

कधीही धूम्रपान न करणार्‍यांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे आणि वायुप्रदूषण या वाढीस कारणीभूत ठरू शकते, असा धक्कादायक खुलासा एका नवीन अभ्यासातून समोर आला आहे. मंगळवारी जागतिक कर्करोग दिनानिमित्त 'द लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसिन जर्नल'मध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला

CIDCO HOMES APPLICATION LAST DATE (1)
8 / 30

घरं २६ हजार, अर्ज २२ हजार; कुणाला कुठे घर मिळणार? ‘या’ तारखेला अंतिम यादी येणार!

सिडकोने नवी मुंबईत २६,५०२ घरांची घोषणा केली होती, परंतु गरीब आणि अल्प उत्पन्न गटासाठी ही घरं महाग ठरली. अर्ज भरण्याची मुदतवाढ देऊनही फक्त २२,००० अर्ज आले. घरांच्या किमती २५ लाख ते ९७ लाख होत्या, ज्यामुळे सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या नव्हत्या. सिडकोने अर्जदारांची मसुदा यादी जाहीर केली असून, अंतिम यादी १० फेब्रुवारीला जाहीर होणार आहे.

What Rahul Solapurkar Said?
9 / 30

“राहुल सोलापूरकरांच्या विधानामागे कुणाचा सडका मेंदू?” रोहित पवारांचा सवाल

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाईच्या पेटाऱ्यांचा वापर न करता, लाच देऊन सुटका केली असा दावा केला आहे. यावरुन वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या विधानावर टीका करत, अशा वादग्रस्त विधानांमागील हेतू शोधण्याची गरज व्यक्त केली आहे.

middle class family
10 / 30

“६० लाख उत्पन्न असलेलाही गरीबच”, सोशल मीडियावर वाद; तुमचं मत काय?

एका नेटकऱ्याने मांडलेल्या आर्थिक वर्गीकरणानुसार, मध्यमवर्गीयांची व्याख्या बदलली आहे. त्यानुसार, ६० लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेला प्रत्येक व्यक्ती गरीब आहे. १२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त केल्याच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला. काहींनी ६० लाख उत्पन्न असलेल्या व्यक्तीला गरीब म्हटल्याबद्दल खिल्ली उडवली, तर काहींनी पिढीजात संपत्तीबाबतच्या वक्तव्याचे समर्थन केले.

Sunetra Pawar Speaker List of Rajyasabha
11 / 30

खासदार सुनेत्रा पवार यांच्यावर राज्यसभेत महत्त्वाची जबाबदारी

राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची तालिका अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले. पहिल्याच टर्ममध्ये त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नेते सुनील तटकरे यांनी एक्स पोस्टद्वारे त्यांचे अभिनंदन केले आणि नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.

Gold Silver Rate Today 4 february 2025
12 / 30

अर्थसंकल्पानंतर सोनं-चांदी स्वस्त झालं की महाग? वाचा आजचा २४ कॅरेट सोन्याचा दर

Today’s Gold Silver Rate : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारी २०२५ रोजी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पानंतर सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून आली, सोन्याचा भाव ८२ हजार रुपये प्रति १० ग्रॅमवरुन थेट ८३ हजारांवर जाऊन पोहोचला. तर चांदीचा दर १ किलो चांदीचा दर थेट ९४ हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पानंतर सोन्या-चांदीच्या दरात घट होईल या आशेवर असलेल्या लोकांचा हिरमोड झाला आहे.

sanjay raut devendra fadnavis varsha bungalow
13 / 30

“वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची मंतरलेली शिंगं…”, संजय राऊतांचा दावा; फडणवीसांना…

राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी झाला, परंतु ते अद्याप 'वर्षा' बंगल्यावर राहायला गेले नाहीत. यावर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच, राऊतांनी भाजपावर टीका करताना संसदेला 'लग्नाचा हॉल' असे संबोधले. फडणवीस वर्षावर झोपायला जाणार नाहीत, असा दावा राऊतांनी केला आहे.

award wapsee marathi news
14 / 30

‘पुरस्कार परत देणार नाही असं आधीच लिहून घ्या’, संसदीय समितीची शिफारस, पुरस्कार वापसीवर…

देशातील राजकीय मुद्द्यांवर निषेध व्यक्त करण्यासाठी अनेक मान्यवर पुरस्कार परत करतात. संसदीय समितीनं अशा कृतीमुळे पुरस्काराचा मान राखला जात नाही, म्हणून पुरस्कार परत न करण्याची लेखी हमी आधीच घेण्याची शिफारस केली आहे. समिती अध्यक्ष संजय झा यांनी प्रतिज्ञापत्रावर सही घेण्याचा पर्याय सुचवला आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने यावर पावलं उचलावी, असंही समितीनं नमूद केलं आहे.

Car washing tips these parts should be prevented from water while washing the car
15 / 30

कार धुताना ही काळजी घ्या, नाहीतर होईल लाखो रुपयांचं नुकसान!

ऑटो February 4, 2025

Car Washing Tips: जेव्हा एखादी व्यक्ती नवीन कार घेते तेव्हा तो तिची खूप काळजी घेतो, परंतु कालांतराने त्याची देखभाल आणि स्वच्छतेकडे फारसे लक्ष देत नाही. लोक पाण्याचा वापर करून गाड्या धुतात, या पाण्याच्या फोर्समुळे अनेकदा गाडीच्या अशा भागांमध्ये पाणी जाते जिथे पाण्याचा थेंबही जायला नको. असे केल्याने गाडीचा तो नाजूक भाग खराब होऊ शकतो. म्हणूनच आज आपण कारमधील अशा भागांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे पाण्याचा एक थेंबही जाऊ देणं धोकादायक ठरेल.

how to get rid of shoe smell instantly
16 / 30

तुमच्या शूजमधून येणारी दुर्गंधी काही मिनिटांत होईल गायब, फॉलो करा फक्त ‘या’ ५ सोप्या टिप्स

Fast Hacks For Removing Odor From Shoes : हिवाळ्यात पायांना भेगा पडू नये किंवा पायाची त्वचा मुलायम ठेवण्यासाठी बहुतेक जण शूजचा वापर करतात. पण शूज घातल्यानंतर अनेकांच्या पायांना खूप घाम येतो अशावेळी शूजमधून खूप दुर्गंधी येऊ लागते. तुम्ही शूज काढताच आजूबाजूचे लोक आधी नाकावर रुमाल धरतात. अशावेळी अत्यंत लाजिरवाणे वाटते. अनेकजण पायांना येणाऱ्या दुर्गंधीने शूज वापरणं सोडून देतात.

Can eating papaya mangoes help you build muscle
17 / 30

पपई-आंबा खाल्ल्याने स्नायूंच्या निर्मितीसाठी मदत होऊ शकते का? तज्ज्ञांचे काय आहे मत…

हेल्थ February 3, 2025

डिजिटल क्रिएटर टेड कार (Ted Carr) यांच्या मते, स्नायू वाढवण्यासाठी पपई आणि आंब्यावर अवलंबून राहणे शक्य आहे. हे ऐकून आम्हालाही तितकेच आश्चर्य वाटले, जितके तुम्हाला वाटेल! स्नायू वाढवण्यासाठी आंबा आणि पपई खरोखरच प्रथिनांना चांगला पर्याय असू शकतात का हे समजून घेण्यासाठी, इंडियन एक्स्प्रेसने एकाहोलिस्टिक न्यूट्रिशनिस्टशी संवाद साधला. काय म्हणाले तज्ज्ञ...

mumbai financial fraud cases pune crime news
18 / 30

वर्षभरात मुंबईकरांची झाली सर्वाधिक आर्थिक फसवणूक, पुणेकर दुसऱ्या क्रमांकावर; इतर शहरांत…

मुंबई February 3, 2025

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून आर्थिक फसवणुकीत आघाडीवर आहे. महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात राज्यात २,१९,०४७ आर्थिक फसवणुकीचे गुन्हे नोंदवले गेले. मुंबईत ५१,८७३ प्रकरणे तर पुण्यात २२,०५९ प्रकरणे नोंदली गेली. ठाणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, सोलापूर आणि इतर जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

Guru Margi 2025
19 / 30

२४ तासानंतर गुरु मार्गी होताच पलटणार ‘या’ तीन राशींच्या लोकांचे नशीब

Guru Margi 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु ग्रह ज्ञान, समृद्धी, ज्योतिष, शिक्षण आणि वैवाहिक सुखाचा कारक मानला जातो. त्यामुळे गुरुच्या हालचालीच्या बदलाने सर्व क्षेत्रांवर विशेष परिणाम दिसून येतो. यात गुरु ९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजून ०१ मिनिटांनी वृषभ राशीत वक्री झाला आणि २ फेब्रुवारी २०२५ रोजी मार्गी झाला, म्हणजे सरळ चाल केली; यामुळे काही राशींचे नशीब आता पालटू शकते. या लोकांच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. नेमकं कोणत्या राशींना याचा फायदा होईल जाणून घेऊ…

mh370 search operation malaysian airlines
20 / 30

बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद शिरसाट यांच्या पत्नी विमानातच होत्या, पण…

२०१४ साली मलेशियन एअरलाईन्सचं MH370 विमान बेपत्ता झालं, ज्यात पाच भारतीय नागरिक होते. पुण्यातील प्रल्हाद शिरसाट यांच्या पत्नी क्रांती शिरसाटही यात होत्या. विमानाचा शोध लागला नाही, आणि २०१७ मध्ये शोधमोहीम थांबवली. डिसेंबर २०२४ मध्ये मलेशिया सरकारने पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यास मान्यता दिली. प्रल्हाद शिरसाट यांनी आशा सोडली असून, मलेशियन सरकारवर विश्वास नसल्याचं सांगितलं.

anjali damania dhananjay munde
21 / 30

उद्या मी पुरावे मांडल्यानंतर फडणवीस, पवार मुंडेंची पाठराखण करूच शकणार नाहीत – दमानिया

बीड सरपंच हत्या प्रकरण धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदापर्यंत पोहोचले आहे. आरोपी वाल्मिक कराड याच्याशी संबंध असल्याने मुंडे चर्चेत आहेत. विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांना पुरावे दिले, पण कारवाई न झाल्याने मंगळवारी मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिला आहे. दमानियांनी मुंडे, फडणवीस, आणि पवार यांच्यावर टीका केली आहे.

Shivraj Rakshe
22 / 30

“…म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला”, शिवराज राक्षेने सांगितलं मॅटवर नेमकं काय घडलं?

अहिल्यानगरमध्ये रविवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची उपांत्य व अंतिम फेरी पार पडली. पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी ठरला. उपांत्य फेरीत शिवराज राक्षे विरुद्ध मोहोळ यांच्यातील सामन्यात पंचांनी ४० सेकंदात मोहोळला विजयी घोषित केलं. या निर्णयावर शिवराजने आक्षेप घेतला व पंचाला लाथ मारली. त्यामुळे शिवराजला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. शिवराजने पंचांच्या निर्णयावर टीव्ही ९ ला प्रतिक्रिया दिली.

Kanye West Wife Bianca Censori naked in Grammy Awards 2025 videos and photos viral
23 / 30

‘ग्रॅमी पुरस्कार’ सोहळ्याच्या रेड कार्पेटवर प्रसिद्ध रॅपरची पत्नी झाली नग्न अन् मग…

मनोरंजन February 3, 2025

दरवर्षी प्रमाणे यंदाचही लॉस एंजेलिसमध्ये ‘ग्रॅमी पुरस्कार’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या भव्य सोहळ्यात काही कलाकार पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले होते, तर काहींनी आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सने प्रेक्षकांना आश्चर्य चकीत केलं. तसंच काही सेलिब्रिटींनी आपल्या अनोख्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. यापैकी एक म्हणजे कान्ये वेस्टची ( Kanye West ) पत्नी बियांका सेंसरी ( Bianca Censori ). बियांका ‘ग्रॅमी पुरस्कार’ सोहळ्याच्या रेड कार्पेटवर थेट नग्न झाली. तिचे फोटो आणि व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाले आहेत.

international-space-station-seen-in-indian-skies
24 / 30

Video: पुणे-मुंबईतून आकाशात दिसलं दुर्मिळ दृश्य; कोणत्याही दुर्बिणीशिवाय पाहायला मिळालं ISS

मुंबई February 3, 2025

रविवारी संध्याकाळी पुणे-मुंबईकरांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (ISS) नुसत्या डोळ्यांनी पाहण्याची संधी मिळाली. भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांच्यासह इतर अंतराळवीर सध्या या स्थानकात आहेत. हे स्थानक पृथ्वीपासून ४०० किमी अंतरावर असून, ७ किमी/सेकंद वेगाने पृथ्वीभोवती ९०-१०० मिनिटांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतं. प्रसाद दीक्षित यांनी या घटनेचा व्हिडीओ 'लोकसत्ता'ला शेअर केला.

Bollywood singer udit Narayan desires for bharat ratna amid Kissing Scandal, Says He Has No Regret
25 / 30

उदित नारायण यांनी भारतरत्न मिळण्याची इच्छा केली व्यक्त, व्हायरल व्हिडीओबाबत म्हणाले…

बॉलीवूड February 3, 2025

दिग्गज गायक उदित नारायण खूप चर्चेत आहेत. उदित नारायण यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते लाइव्ह कॉन्सर्टमध्ये काही महिलांच्या गालावर, तर काही जणींच्या ओठांवर चुंबन घेताना दिसत आहे. त्यामुळे उदित नारायण यांच्यावर सध्या टीकास्त्र होतं आहे. अशातच दुसऱ्या बाजूला उदित नारायण यांनी भारतरत्न मिळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसंच व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत “मला कसलाही पश्चाताप झाला नाही”, असं वक्तव्य उदित नारायण यांनी केलं आहे.

mahakumbh 2025
26 / 30

आज महाकुंभमेळ्यातील शेवटचे अमृत स्नान! बुधादित्य योगामुळे ‘या’ ३ राशींचा होईल भाग्योदय

महाकुंभ २०२५ चे तिसरे आणि शेवटचे अमृत स्नान ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.३ फेब्रुवारी रोजी सूर्य आणि बुध मकर राशीत असतील, ज्यामुळे बुधादित्य राजयोग निर्माण होईल.ज्योतिषशास्त्रात हा योग शुभ मानला जातो. त्याच वेळी, शनि त्यांच्या घरात कुंभ राशीत, गुरु वृषभ राशीत आणि शुक्र मीन राशीत असेल. अशा परिस्थितीत, ग्रहांच्या स्थितीमुळे, काही राशी असलेल्या लोकांना भाग्याची साथ मिळू शकते.

uddhav thackeray on nirmala sitharaman budget 2025
27 / 30

‘एका सामान्य कुवतीच्या महिलेने…’, निर्मला सीतारमण यांचा उल्लेख करत ठाकरे गटाची टीका!

केंद्रीय अर्थसंकल्पात १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली. पंतप्रधान मोदींनी निर्मला सीतारमण यांचं अभिनंदन केलं. सत्ताधारी पक्षांनी स्तुती केली, तर विरोधकांनी फसवणूक असल्याचा दावा केला. ठाकरे गटानं गणित मांडून ही घोषणा फोल असल्याचं सांगितलं. त्यांनी बजेट निवडणूकप्रधान असल्याचं म्हटलं आणि महागाई व बेरोजगारी कमी होणार नसल्याचा सवाल उपस्थित केला.

premachi Goshta serial trp dropped after tejashri Pradhan exit
28 / 30

तेजश्री प्रधानच्या एक्झिटनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला बसला मोठा फटका

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तेजश्री प्रधानने 'प्रेमाची गोष्ट' मालिकेला रामराम केला. त्यामुळे आता मालिकेत मुक्ताच्या भूमिकेत तेजश्री ऐवजी अभिनेत्री स्वरदा ठिगळे पाहायला मिळत आहे. पण, तेजश्रीच्या एक्झिटचा मोठा परिणाम मालिकेवर झाल्याचं समोर आलं आहे. 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा टीआरपी मोठ्या प्रमाणात घसरला आहे.

Sandeep Narayan Sings Marathi Song Kanda Raja Pandhricha
29 / 30

शास्त्रीय गायक संदीप नारायण जेव्हा ‘कानडा राजा पंढरीचा’ गातात!

मनोरंजन February 2, 2025

जयपूर येथे ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत जयपूर साहित्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ४७ देशांचे प्रतिनिधी, ३१ नोबेल आणि पुलित्झर पुरस्कार विजेते लेखक सहभागी झाले आहेत. संदीप नारायण यांच्या 'कानडा राजा पंढरीचा' गाण्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. हे गाणं गदिमांनी लिहिलं असून, १९७० च्या 'झाला महार पंढरीनाथ' चित्रपटातील आहे.

Bigg Boss marathi Ankita Prabhu Walawalkar invite to raj Thackeray for wedding
30 / 30

अंकिता वालावलकरने राज ठाकरेंना दिलं लग्नाचं निमंत्रण, होणाऱ्या पतीसह गेलेली ‘शिवतीर्था’वर

‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने लोकप्रिय असणारी कोकण कन्या अंकिता वालावलकर ‘बिग बॉस मराठी’मुळे अधिक प्रसिद्धी झोतात आली. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात अंकिता जबरदस्त खेळताना दिसली. त्यामुळे अंकिता टॉप-५पर्यंत पोहोचली. ‘बिग बॉस’च्या घरातला तिचा खेळ अनेकांना आवडला. आता लवकरच ही कोकण कन्या लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे सध्या अंकिता लग्नाची जोरदार तयारी करताना दिसत आहे. नुकतंच तिने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लग्नाचं निमंत्रण दिलं. याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.