“काय मग विशेष?”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुवैतमध्ये साधला मराठीतून संवाद!
पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच कुवैतला जाऊन आले, जिथे त्यांनी भारत आणि आखाती देशांमधील द्विपक्षीय संबंध वाढवण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. दोन दिवसीय दौऱ्यात त्यांनी गल्फ स्पिक लेबर कॅम्पमधील भारतीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी रत्नागिरीतील एका व्यक्तीशी मराठीतून बोलताना, मोदींनी त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली आणि उच्च शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. मोदींच्या या संवादाने कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळाले.