मोदींच्या अमेरिका दौऱ्यात मोठ्या घडामोडी; तहव्वूर राणासंदर्भात ट्रम्प यांची घोषणा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यात, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २००८ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली. राणा सध्या लॉस एंजेलिसमध्ये तुरुंगात आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले. राणाने हल्ल्यांसाठी गुप्त माहिती गोळा करण्यात डेव्हिड हेडलीला मदत केली होती. मोदी-ट्रम्प भेटीत दहशतवादविरोधी सहकार्यावर चर्चा झाली.