प्रणव मुखर्जींच्या शोकसभेबाबत मुलगी शर्मिष्ठा यांचे दावे मुलगा अभिजीत यांनी फेटाळले!
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिस्थळासाठी जागेवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने जागेची मागणी केली असता, सरकारने तशी तजवीज करण्याचे आश्वासन दिले. मात्र, जागेच्या ठिकाणावरून वाद सुरू झाला. प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेसवर शोकसभा न घेण्याचा आरोप केला, तर त्यांचे बंधू अभिजीत मुखर्जी यांनी कोविड निर्बंधांमुळे सभा न झाल्याचे स्पष्टीकरण दिले.