“निर्मला सीतारमण जीनियस आहेत, १ लाखाच्या कारवर…”, प्रशांत भूषण यांनी GST चं मांडलं गणित!
नुकत्याच पार पडलेल्या ५५व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत जुन्या गाड्यांच्या विक्रीवर १८% जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचाही समावेश आहे. या निर्णयामुळे सेकंड हँड गाड्यांच्या बाजारात चर्चा सुरू झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी या निर्णयावर टीका करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना लक्ष्य केले आहे. जीएसटीसंदर्भात देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.