जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट संपुष्टात, नवं सरकार स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग!
जम्मू काश्मीरमधील सहा वर्षांची राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली आहे. केंद्र सरकारने अधिसूचना जारी करून हा निर्णय घेतला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा, २०१९ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. आता लवकरच ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्त्वाखालील नॅशनल कॉन्फरन्स पक्ष येथे सत्ता स्थापन करणार आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केंद्र सरकारला विनंती केली होती.