पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर प्रियांका गांधींचं सडेतोड उत्तर; म्हणाल्या, “खूप….
लोकसभेत संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासावर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींवर टीका केली. त्यांच्या भाषणावर काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "मोदींनी काहीही नवं सांगितलं नाही, आम्ही बोअर झालो. भ्रष्ट्राचारप्रती शून्य सहिष्णूता आहे तर अदाणी प्रकरणावर चर्चा करा."