Video:भारताचा तिरंगा फाडला,परराष्ट्रमंत्र्यांसमोर गोंधळ; लंडन पोलीसांची बघ्याची भूमिका
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सध्या लंडन दौऱ्यावर असून त्यांच्या कारसमोर खलिस्तानी समर्थकांनी गोंधळ घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जयशंकर ४ ते ९ मार्च दरम्यान ब्रिटन आणि आयर्लंड दौऱ्यावर आहेत. लंडनमध्ये द्वीपक्षीय संबंध, व्यापार, शिक्षण-आरोग्य या विषयांवर चर्चा करताना खलिस्तान समर्थकांनी भारताचा राष्ट्रध्वज फाडला. लंडन पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्याने भारतीयांमध्ये संताप व्यक्त होत आहे.