‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; वाजपेयींच्या जयंतीदिनी गोंधळ…
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं आवडतं भजन 'रघुपती राघव राजाराम' पाटण्यात आयोजित अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रमात गायिका देवी यांनी गायलं. 'इश्वर अल्लाह तेरो नाम' या ओळींवर काही लोकांनी गोंधळ घातला, ज्यामुळे देवी यांना भजन थांबवावं लागलं. या घटनेवर शाहनवाज हुसैन आणि अश्विनी कुमार चौबे यांनी खंत व्यक्त केली आणि असहिष्णुतेचा निषेध केला.