सर्वाधिक गर्दीच्या शहरांच्या यादीत पुणे तिसऱ्या स्थानावर; मुंबईचं स्थान कितवं?
टॉमटॉमच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये भारतातील सर्वाधिक गर्दीचं शहर कोलकाता ठरलं आहे. कोलकात्यानंतर बंगळुरू आणि पुण्याचा क्रमांक लागतो. २०२३ मध्ये बंगळुरू सर्वाधिक गर्दीचं शहर होतं, पण २०२४ मध्ये कोलकाताने बाजी मारली. कोलकात्यात १० किमी अंतर कापण्यासाठी ३४ मिनिटे लागतात. जागतिक स्तरावर कोलकाता दुसऱ्या, बंगळुरू तिसऱ्या आणि पुणे चौथ्या क्रमांकावर आहेत. इतर गर्दीची शहरे हैदराबाद, चेन्नई, मुंबई, अहमदाबाद, एर्नाकुलम आणि जयपूर आहेत.