राहुल गांधींना दिलासा! हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा घेतला मागे, ‘हे’ गुन्हे कायम!
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे काँग्रेसने देशभर आंदोलन पुकारले. संसदेत भाजपा-इंडिया आघाडीच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की झाली, ज्यात भाजपाचे दोन खासदार जखमी झाले. याप्रकरणी राहुल गांधींविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता, परंतु तो आता मागे घेण्यात आला आहे. मात्र, इतर गुन्हे कायम आहेत. काँग्रेसनेही भाजपाविरोधात पलटवार केला आहे.