Video: “महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त कसे?” राहुल गांधींनी मांडलं गणित!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयावर राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले. त्यांनी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेत बदल, मतदार याद्यांमध्ये अनियमितता आणि नव्या मतदारांच्या संख्येत वाढ यावर प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधींनी तीन मुद्दे मांडले: मतदारांची वाढलेली संख्या, लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार, आणि विरोधी पक्षांच्या मतांमध्ये घट नसणे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे मतदार याद्या मागितल्या आहेत.