“मंदिर म्हणजे ट्रस्टींची खासगी मालमत्ता नाही”, न्यायालयाने फटकारलं; याचिकाकर्त्या महिलेला
राजस्थानमधील महाकालेश्वर महादेव जी सिद्ध धाम मंदिराच्या ट्रस्टींनी अनुसूचित जातीच्या महिलेला मंदिराच्या प्रतिबंधित भागात प्रवेश करण्यावरून घेतलेल्या आक्षेपावर उच्च न्यायालयाने ट्रस्टींना फटकारलं. न्यायालयाने ट्रस्टींचा युक्तिवाद फेटाळून लावताना मंदिर हे सार्वजनिक ठिकाण असल्याचं स्पष्ट केलं. न्यायालयाने नमूद केलं की, महिलेला प्रवेश नाकारणं आणि तिच्यावर गुन्हा दाखल करणं हे जातीभेदाचं उदाहरण आहे.