Video: “विरोधी दलों की रात हो रही है काली…”, आठवलेंची वक्फ बिलावर शायरी, सभागृहात हशा!
गेल्या दोन दिवसांत संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झालं आहे. राज्यसभेत बोलताना रामदास आठवले यांनी विधेयकाच्या बाजूने भूमिका मांडली आणि काँग्रेसवर टीका केली. त्यांनी विधेयक मुस्लिमांना न्याय मिळवून देण्यासाठी असल्याचं सांगितलं. चर्चेदरम्यान आठवलेंनी शायरी सादर केली, ज्यामुळे सभागृहात हशा पिकला. विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येईल.