रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्याचे पडसाद संसदेत,अश्लील जोकच्या मुद्द्यावरुन कोण काय म्हणालं?
रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्यामुळे संसदेत गदारोळ झाला आहे. विरोधकांनी त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. बीजू जनता दलाचे खासदार एम. पी. पात्रा आणि शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी रणवीरच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. रणवीरने एका स्पर्धकाला विचारलेल्या अश्लील प्रश्नामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. संसदीय समितीने त्याला नोटीस बजावली असून, त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.