“…कारण महापुरुष कधीच मरत नाहीत”, रतन टाटांच्या निधनानंतर आनंद महिंद्रांची पोस्ट
प्रसिद्ध उद्योगपती आणि समाजसेवक रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देश दुःखात बुडाला आहे. आनंद महिंद्रा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. मोदींनी रतन टाटा यांना दूरदर्शी व्यापारी नेतृत्त्व आणि दयाळू व्यक्तीमत्त्व म्हणून गौरवले. टाटा यांचे योगदान शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता आणि प्राणी कल्याण क्षेत्रात महत्त्वपूर्ण होते.