“माफ करा, माझा कुत्रा आजारी आहे”, रतन टाटांनी प्रिन्स चार्ल्सचा पुरस्कारही नाकारला होता!
भारतीय उद्योग विश्वाचे अध्वर्यू रतन टाटा यांचं बुधवारी रात्री निधन झालं. उद्योग क्षेत्रात माणुसकी आणि आपुलकी जपणाऱ्या टाटांनी समाजकार्यातही मोठं योगदान दिलं. २०१८ साली ब्रिटिश राजघराण्याने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्याचा सोहळा आयोजित केला होता. मात्र, रतन टाटांनी त्यांच्या आजारी कुत्र्यांमुळे या सोहळ्याला नकार दिला. प्रिन्स चार्ल्स यांनी त्यांच्या या निर्णयाचं कौतुक केलं. रतन टाटांचं प्राणीप्रेम सर्वश्रुत आहे.