“…अन् मी रतन टाटांकडून नम्रतेचा धडा घेतला”, नारायण मूर्तींनी सांगितली जुनी आठवण!
टाटा उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. इन्फोसिसचे अध्यक्ष नारायण मूर्ती यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. मूर्ती यांनी सांगितले की, रतन टाटा हुबळीतील अक्षय पत्र किचनच्या उद्घाटनासाठी आले होते आणि त्यांनी सर्व कार्यक्रमात सहभाग घेतला होता. दिल्लीत आयोजित डिनर कार्यक्रमातही टाटा यांनी विनम्रतेने सहभाग घेतला होता.