“भारत सरकारनं लाल किल्ला बळकावला”, मुघल सम्राटाच्या वंशजांचा थेट दावा; न्यायालयात सुनावणी!
राजधानी दिल्लीतील लाल किल्ला सत्तेच्या केंद्राचं प्रतीक आहे. मुघल सम्राटाच्या वंशजांनी भारत सरकारने बेकायदेशीररीत्या ताबा घेतल्याचा दावा केला आहे. सुलताना बेगम यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, पण ती फेटाळण्यात आली. बेगम यांनी बहादुरशाह झफरच्या वारस असल्याचा दावा केला, परंतु न्यायालयाने १६४ वर्षांनंतर केलेला दावा मान्य केला नाही. त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.