“मी निवडून आलो तर प्रियांका गांधींच्या गालासारखे…”, भाजपा उमेदवाराची जीभ घसरली!
महाराष्ट्रातील निवडणुका संपल्यानंतर दिल्लीत विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे. भाजपाचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी प्रियांका गांधींवर वादग्रस्त टिप्पणी केली आहे, ज्यामुळे काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. बिधुरी म्हणाले, "मी निवडून आलो तर प्रियांका गांधींच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते बनवेन." काँग्रेसने भाजपाला महिलाविरोधी पक्ष संबोधून माफी मागण्याची मागणी केली आहे. आपचे संजय सिंह यांनीही भाजपावर टीका केली आहे.